Belagavi

2बी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी एसडीपीआयचे आंदोलन

Share

राज्यातील मुस्लीम समाजाला दिलेले 2बी आरक्षण पूर्ववत लागू करावे आणि आरक्षणात 8% वाढ करावी या मागणीसाठी सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बेळगावातील कोंडुसकोप्प येथे जोरदार आंदोलन केले.

गांधी नगरमध्ये जमलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. काँग्रेस सरकार सत्तेवर येताच मुस्लिम समाजाला 2बी आरक्षण लागू करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी बेळ्ळारी येथे सांगितले होते. मात्र आता अधिवेशनात त्यावर सभागृहात चर्चा झाली नाही, ते भाजपला घाबरले आहेत का? असा सवाल करत एकजूट होऊन सरकारविरोधात मोर्चा काढून कोंडुसकोप्प येथे निदर्शने केली.

यावेळी शेतकरी नेत्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षात मुस्लिम जनता सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, तसेच या लढ्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली.

दुसरे मुस्लिम नेता म्हणाले की, राज्यातील मागील भाजप सरकारने मुस्लिम समाजाला मागासवर्गीयांमधून वगळण्यासाठी 2बी आरक्षण रद्द केले. काँग्रेसचे सरकार आल्यास 2B आरक्षण पुन्हा बहाल केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. सत्तेत येऊन सहा महिने झाले तरी काँग्रेस सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

Tags: