Belagavi

खासगी शाळा संघटना उद्या सरकारविरोधात करणार आंदोलन

Share

विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी विनाअनुदानित खासगी शाळा संघटनेतर्फे (रुपसा) तर्फे उद्या 11 डिसेंबर रोजी बेळगाव येथील सुवर्ण सौधच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

यासंद्रहत प्रसारमाध्यमांशी बोलताना खासगी शाळा संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, 1995 नंतरच्या सर्व कन्नड माध्यमांच्या शाळांना सरकारने अनुदान दिले पाहिजे. आरटीई अंतर्गत 25% मुलांची खासगी शाळांमध्ये नोंदणी पूर्ववत करावी. 16,000 रुपये शुल्क 35,000 रुपये करावे, अशी मागणी त्यांनी केली.

खासगी शाळांच्या नूतनीकरणादरम्यान आवश्यक असलेल्या अग्निसुरक्षा आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्रांत सवलत देण्यात यावी. खासगी अनुदान नसलेल्या मान्यताप्राप्त शाळांचे नूतनीकरण 10 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित करावे, याकडे मंत्री व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags: