Belagavi

मुचंडी शासकीय उच्च प्राथमिक मराठी शाळेचा अमृत महोत्सव

Share

स्वातंत्र्याच्या वेळी सुरू झालेल्या मुचंडी शासकीय उच्च प्राथमिक शाळेचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. येथे शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवले आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काढले.

यमकनमर्डी मतदारसंघातील मुचंडी गावातील शासकीय उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री महोदयांनी दीपप्रज्वलन करून केले. या शाळेच्या प्रगतीत एसडीएमसी सदस्य आणि मुखंडीच्या ग्रामस्थांचाही वाटा असल्याचे ते म्हणाले.

शासकीय उच्च प्राथमिक मराठी शाळा अमृत महोत्सव साजरा करत असून, या शाळेची देखभाल आणि संगोपन करण्यात आमच्यासह पूर्वीच्या सर्व राजकीय नेत्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत योगदान दिले आहे. मात्र गेल्या 15 वर्षांच्या आमच्या कार्यकाळात मी शाळेच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत व सहकार्य केले आहे. यापुढील काळातही आमची मदत व सहकार्य राहील, असे ते म्हणाले.


यावेळी श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, नेते मारुती यल्लाप्पा कोटो, लक्ष्मण केंचप्पा बुद्री, शंकर पी. मुतकेकर, वाय. बी. तहसीलदार, परशराम भरमा पाखरे, अशोक शिरोळे, आर. एम. चौगुले, मुख्याध्यापक पी. एन. खेमणे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

Tags: