आगामी महालक्ष्मी यात्रेच्या निमित्त बेनकनहळ्ळी येथे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पुढील वर्षी करण्याचे नियोजन आहे. त्यानिमित्त महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी गावभरातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
गावात जत्रेचे वातावरण निर्माण झाले आहे, गावातील मुख्य रस्ता, मराठी शाळेच्या पाठीमागे, पाटील गल्ली, पुंडलिक कॉलनी, सुभाष गल्ली आदी ठिकाणी काँक्रीट रस्ता व गटारीसाठी भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, जत्रा महोत्सवाबाबत मंत्र्यांनी ग्रामस्थांशी प्रदीर्घ चर्चा केली.
यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ग्रामस्थ बाळू देसुरकर, मोनाप्पा पाटील, कल्लाप्पा देसुरकर, महेश कोलकार, मीनाक्षी पाटील, सीपीआय हिरेमठ, मदन पाटील, कंत्राटदार सचिन सामजी, ज्योतिबा देसुरकर, रघु खांडेकर, मोहन कांबळे, राजेश नांदेकर, ग्रामपंचायत सदस्य व मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.


Recent Comments