Belagavi

पंचमसाली आरक्षणासाठी 13 डिसेंबर रोजी बेळगावात आंदोलन

Share

पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी 13 डिसेंबर रोजी बेळगावात गांधी भवन ते चन्नम्मा सर्कलपर्यंत भव्य आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.

बेळगावात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जयमृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, 2-ए आरक्षण देताना राज्य सरकारने पंचमसाली समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात सरकारवर दबाव आणण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव अधिवेशनादरम्यान येथे पंचमसाली नेत्यांची बैठक बोलवावी, असा आमचा आग्रह होता. मात्र त्यांनी बेंगळूरला फोन करणार असल्याचे सांगितले. उत्तर कर्नाटकात पंचमसाली समाज मोठ्या संख्येने असून, येथे बैठक बोलवावी, अशी मागणी केली.

बेळगावात अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे नुकतेच पंचमसाली समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आमच्या समाजातील आमदार आणि मंत्र्यांनी बैठक घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यास पटवून द्यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

लिंगायत समाजाला 2-ए आरक्षण आणि सर्व जातींना ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून लढा देत आहोत. गेल्या भाजप सरकारने आम्हाला 2-ए आरक्षण देणार असे सांगून त्यात पुन्हा चूक केली होती. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि त्यांना आरक्षण देण्याची विनंती केली. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले जोते. परंतु दुर्दैवाने आतापर्यंत ती बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत सिद्धू गौडर, आर. के. पाटील, आदिवेश इटगी, गुंडू पाटील, शिवू तंबाकी, श्रीशैल बोरन्नवर, इरण्णा बिसरोट्टी आदी उपस्थित होते.

Tags: