शालेय आयांना शासनाच्या आदेशानुसार 17 हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीसाठी राज्य प्राथमिक शाळा शिक्षिका संघटनेने बेळगावमधील सुवर्ण सौधजवळ येथे आंदोलन केले.
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार घरभाडे भत्ता आणि अन्य भत्त्यासहित वेतन देण्यात यावे. 1 जानेवारी 2012 नंतर मरण पावलेल्या आयांच्या पदांसाठी त्यांच्या निकटवर्तीयांना घेण्यात यावे. वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या आयांसाठी ₹ 6000 पेन्शन निश्चित करावी. आम्हाला ड श्रेणीचे कर्मचारी मानून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमच्यासाठी किमान वेतन निश्चित करण्यात यावे. 2002 ते 2012 पर्यंतची उन्हाळी सुट्टीची थकबाकी दयावी . बेळगाव, चिक्कोडी, मंड्या, चामराजनगर, कोडगू, चिक्कबल्लापूर, हावेरी या शैक्षणिक जिल्ह्य़ांचे वेतन अद्याप बाकी आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पगार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली


Recent Comments