कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या सदस्यांनी सरकारने प्रलंबित बिले देण्यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सुवर्णसौधजवळ निदर्शने केली.
वीज कंत्राटदारांनी पदरमोड करून केपीटीसीएल व हेस्कॉम विभागाची अनेक कामे पूर्ण केली आहेत. मात्र केपीटीसीएल व हेस्कॉम त्या कामांची बिले देत नसल्याने कंत्राटदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ७-८ महिन्यांपूर्वीची बिले अद्याप मिळाली नसल्याने कंत्राटदार गोत्यात आले आहेत. त्यामुळे प्रलंबित बिले त्वरित द्यावीत तसेच मनुष्यबळाची जाचक अट काढण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केले.
यावेळी इन न्यूजशी बोलताना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे नेते प्रकाश देसाई म्हणाले की, केपीटीसीएल आणि हेस्कॉमची कामे निविदेतील कमिशनच्या आधारे असत. मात्र आता टेंडरमध्ये मनुष्यबळाची अट घालण्यात आली आहे. मनुष्यबळ ठेकेदारांना कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे विभागाचा आणि ठेकेदाराचाही फायदा होत नाही. ज्यांनी कामे केली आहेत त्यांनाच हे शक्य असल्याने मॅन पॉवर एजन्सीऐवजी अधिकृत कंत्राटदारांनाच कामे द्यावीत, असे प्रकाश देसाई यांनी सांगितले.


Recent Comments