बेळगावात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या बेळगाव युनायटेड फ़ुटबॉल अकादमीला भारतीय फुटबॉल महासंघाकडून 3 स्टार इलाईट ऍक्रीडेशन प्राप्त झाले आहे.
अकादमीचे पॅट्रोन अमन सेठ यांनी बेळगावात आज पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, बेळगावात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देऊन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल खेळाडू तयार करण्यासाठी बेळगाव युनायटेड फ़ुटबॉल अकादमीची (बुफा) स्थापना करण्यात आली आहे. या अकादमीला अल्पावधीतच भारतीय फुटबॉल महासंघाकडून 3 स्टार इलाईट ऍक्रीडेशन प्राप्त झाले आहे. यामुळे बेळगावातील फुटबॉल खेळाडूंना बेळगावातच सराव करून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बुफाकडे एआयएफएफ प्रशिक्षित फुटबॉल कोच असून त्यांच्याकरवी रोज सायंकाळी खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंडर-५, अंडर-७ स्तरापासूनच बालवयातच मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल फुटबॉल खेळाडू बनविण्याचा आमचा मानस आहे, असे सांगून त्यांनी अधिक माहिती दिली.
यावेळी बुफाचे संस्थापक मतीन इनामदार, अमीन पिरजादे यांनी बुफेच्या उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली.


Recent Comments