Vijayapura

माझा आयसिसशी संबंध यत्नाळ यांनी पुराव्यानिशी करावा सिद्ध

Share

मुस्लिम धर्मगुरू सय्यद मोहम्मद तन्वीर पीर हास्मी यांच्यावर आमदार यत्नाळ यांनी आयसिस दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आणि मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठ सामायिक केल्याचा आरोप केला आहे .  आमदार यत्नाळ यांच्या आरोपाला मौलवींनी आव्हान दिले आहे .

आ . यत्नाळ यांच्या विधानाविरोधात प्रसिद्धी करून मौलवी यांनी प्रतिक्रिया दिली बसनागौडा पाटील यत्नाळ यांचे विधान सिद्ध झाल्यास या देशाचा त्याग करून पळून जाईन. सिद्ध न झाल्यास यत्नाळ यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी पाकिस्तानात पळून जावे असे आव्हान मुस्लिम धर्मगुरू सय्यद मोहम्मद तन्वीर पीरा हास्मी यत्नाळ यांना दिले आहे माझ्यावर झालेल्या आरोपात तथ्य नाही .

04-12-2023 रोजी हुबळी येथे आयोजित अवलाद गौसाए आझम परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एकाच मंचावर वेगवेगळ्या दर्ग्यांचे मौलवी देखील उपस्थित होते . यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कायदामंत्री एच.के.पाटील आणि इतर मंत्री आमदार उपस्थित होते मुख्यमंत्री हे कोणत्याही जाती किंवा समाजापुरते मर्यादित नसतात राजकारणात सर्व धर्म आणि जातीचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत

मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता न पाहता यत्नाळ यांनी माझ्याविरोधात वक्तव्य केले आहे यत्नाच्या विधानात तथ्य नाही त्यांनी मुस्लीम समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे त्याचा उद्देश फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा आहे सर्व केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांना हे पुराव्यानिशी सिद्ध करू द्यात कि मी आयसिस च्या अतिरेक्यांशी संबंधित आहे तसे असल्यास, शहराच्या आमदारांनी एका आठवड्याच्या आत मी आयसिसच्या अतिरेक्यांमध्ये सामील असल्याची कागदपत्रे जाहीर केली पाहिजेत.

अन्यथा आमदार पदाचा राजीनामा देऊन पाकिस्तानात पळून जावे, असे आव्हान मौलवीने दिले माझे अनुयायी आणि मी आयसिस सोबत असल्याचे सिद्ध झाल्यास मी माझ्या देशाचा त्याग करेन . दहशतवादावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत देशाचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो होतो यत्नाळ जनतेला चुकीचा संदेश देत आहे की मी आयसिस मध्ये सामील आहे मीडियामध्ये दाखवलेले फोटो माझ्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून आहेत ते फोटो दहा-बारा वर्षांपूर्वीचे आहेत

इराकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान सुफी महेबूब ए सुभानी गौस ए आजम यांच्या भेटीची छायाचित्रे तेथील दर्ग्याचे पीठासीन अधिकारी खालिद जिलानी यांच्या आशीर्वाद प्रसंगी काढलेले फोटो आहेत . खालिद जिलानी यांचा अंगरक्षक मला त्यांच्या पिठात घेऊन जात असल्याचे आणखी एका फोटोत दिसत आहे. मौलवी सय्यद मोहम्मद तन्वीर पीर हास्मी यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे

Tags: