Belagavi

टिप्पर आणि कारमध्ये भीषण अपघात : मुलीसह दोघांचा होरपळून मृत्यू

Share

बेळगाव तालुक्यातील देवगिरी बंबरगे क्रॉसजवळ हा अपघात झाला. लग्न आटोपून परत बंबरगे गावाकडे निघालेल्या कारने समोरून आलेल्या टिप्परला धडक दिली. त्यामुळे टिप्परची डिझेल टाकी फुटून आग लागली. या आगीत मुलीसह दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला .

या आगीत मोहन मारुती बेळगावकर (24) राहणार बंबरगे आणि समिक्षा देवकर (12) राहणार मच्छे या दोघांचा मृत्यू झाला असून , कारमधील आणखी दोघेजण जखमी झाले आहेत .

कारमधील महेश बेळगावकर आणि स्नेहा बेळगुंदकर यांना स्थानिकांनी वाचवून रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

दरम्यान, डीसीपी स्नेहा, एसीपी आणि काकती स्टेशन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठवले. अपघातानंतर टिप्पर चालकाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

Tags: