बेळगावातील नानावाडीतील आश्रय कॉलनीत असलेल्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात अज्ञात चोरटयांनी चोरी करून देवाचे किंमती दागिने लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बेळगावातील नानावाडीतील आश्रय कॉलनीत असलेल्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामधील मूर्तीवरील चांदीचे दोन किलो वजनाचे कवच आणि सोन्याचा मुलामा दिलेला हार अशा दोन वस्तू आज पहाटे चोरीला गेल्या आहेत.
चोरट्यांनी मंदिरचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून या वस्तू लांबविलया आहेत. मंदिर प्रशासनाने याबाबतची तक्रार टिळकवाडी पोलिस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणून चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Recent Comments