Belagavi

बेळगावात चन्नम्मा चौकात वकिलांचे अचानक आंदोलन

Share

चिक्कमंगळूर पोलिसांनी तेथील वकील प्रीतम यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आणि पोलिस ठाण्यात केलेल्या कारवाईचा निषेध करत दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत बेळगावातील शेकडो वकिलांनी सोमवारी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून रास्ता रोको केला.

सरकारने वकिलांसाठी वकील संरक्षण कायदा लागू करावा. तसेच क्षुल्लक कारणावरून वकिलावर अंदाधुंद हल्ला करण्याची चिकमंगळूर शहर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही. त्यामुळे हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सरकारचे मंत्री, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस व भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मार्गावरील शून्य वाहतूक व्यवस्थेच्या विरोधात जनता नाराजी व्यक्त करत असतानाच चन्नम्मा सर्कल येथे वकिलांनी अचानक आंदोलन केल्याने जनता आणखी संतप्त झाली आहे. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या वकिलाने जनतेसमोर असे वागणे कितपत योग्य आहे, असे सांगत वकिलाच्या वागण्यावर जनतेने संताप व्यक्त केला.

यावेळी सुरेंद्र उगारे, आर. पी. पाटील, अनंत मांजरेकर, बाळकृष्ण कांबळे, विनोद पाटील, हेग्गन्नावर, मल्लापूरे, सुमिता, मंगला हिरेमठ आदी उपस्थित होते.

Tags: