शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन 5 एकरातील उसाचा फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील करिबंटनाळ गावात घडली.

बसवनबागेवाडी तालुक्यातील करिबंटनाळ गावात शेतातील विजेच्या खांबाला शॉर्टसर्किट होऊन 5 एकरातील उसाचा फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शेतकरी सीबी पाटील यांच्या मालकीचा हा फड आहे. फडातील संपूर्ण ऊस या घटनेत जळाला आहे.

स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र लाखोंच्या उसाचे नुकसान झाले. बसवनबागेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments