कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 4 ते 15 डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे होणार असून, त्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी 5 हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी दिली.
4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, राजकारणी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाची मोठी समस्या आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासासाठी जर्मन तंबू वापरून टाऊनशिप बांधण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी ५ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एस.एन.सिद्रामप्पा यांनी दिली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या निवासासाठी चार मोठे जर्मन तंबू असलेली एक मोठी टाऊनशिप बांधण्यात आली आहे. अधिवेशनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुवर्ण विधानसौध, अलारवाडाजवळ दोन कोटी रुपये खर्चून टाऊनशिप बांधण्यात आली आहे. म्हैसूरचे केएम शरीफ यांनी या टाऊनशिपच्या बांधकामाचे काम हाती घेतले असून 100 कामगार तेरा दिवसांपासून या मंडपाच्या उभारणीत गुंतले आहेत. ते आता जवळपास पूर्ण झाले आहे. बाईट
टाऊनशिपमध्ये चार मोठे जर्मन तंबू आणि एक छोटा तंबू बांधण्यात आला, एक जर्मन तंबू 100 फूट रुंद आणि 200 फूट लांब असेल. या प्रकारचे एकूण चार जर्मन तंबू बांधले आहेत. अधिकाऱ्यांसाठी छोटा मंडपही बांधण्यात आला होता. प्रत्येक टाऊनशिपमध्ये पाचशे कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हलग्याजवळ उभारलेला तंबू वॉटर प्रूफ तंबू असून येथे एकूण 2000 पोलिस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना खाट, उशा, आणि चादर देण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल चार्जिंग सिस्टम देखील उपलब्ध केली आहे. हलग्याव्यतिरिक्त सांबरा, कंग्राळी खुर्द येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र व अन्य काही ठिकाणी उर्वरित पोलिसांची निवासाची व्यवस्था केल्याचे पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी सांगितले.


Recent Comments