Vijayapura

सिंदगी तालुका रुग्णालय व्यवस्थापनात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Share

विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुका रुग्णालयाच्या व्यवस्थापनात अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या रुग्णालयाला कोणी वाली आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिंदगी तालुका रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर जनक्षोभ निर्माण झाला आहे. सिंदगी तालुका रुग्णालय इमारतीचा स्लॅब गळती लागून खराब झाल्याने त्याकडे दुर्लक्ष का केले जातेय?, असा सवाल नागरिक करत आहेत. आधीच रूग्णालयात कॉटवरील बेड आणि कव्हर उखडून गेले आहेत. अनेक ठिकाणी स्लॅबचा गिलावा पडला आहे, त्याची किरकोळ दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या इमारतीच्या छताला शेवाळ पकडले आहे. पाऊस नसताना अशी स्थिती असताना पावसाळ्यात काय स्थिती असेल असा सवाल स्थानिक करत आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्याधिकाऱ्यानी तातडीने रुग्णालयात भेट देऊन पाहणी करण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. कोणतीही आपत्ती होण्यापूर्वी जागे व्हावे आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. फ्लो

Tags: