बेळगाव येथील केपीटीसीएलचे ज्युनियर इंजिनियर शंकर कृष्णा चौगुले यांना सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला.
केपीटीसीएलचे ज्युनियर इंजिनियर शंकर कृष्णा चौगुले हे ३७ वर्ष ८ महिने व ५ दिवसांच्या प्रदीर्घ सेवेतून काल गुरुवार दि. 30/11/23 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त 110केव्ही कणबर्गी पॉवर स्टेशन येथे केपीटीसीएलचे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच त्यांचे सर्व कुटुंबियांनी मिळून त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Recent Comments