Belagavi

पंचमसाली आरक्षण संदर्भात सर्व पक्षांच्या आमदारांची बैठक : कुडलसंगम स्वामी

Share

लिंगायत पंचमसालींना २ ए श्रेणीचे आरक्षण मिळावे यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ५ डिसेंबर रोजी बेळगाव येथे सर्व पक्षांच्या आमदार व माजी आमदारांची बैठक घेणार आहोत असे कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले.

लिंगायत पंचमसाली समाजाची राज्य कार्यकारिणीची बैठक बेळगाव शहरात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. फ्लो
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बसव जय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, ‘आम्ही मागील भाजप सरकारने दिलेल्या ‘2डी’ आरक्षणावर समाधानी नाही. लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही इष्टलिंग पूजेने भांडू लागलो. आम्ही विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध केला आहे. मात्र, न्याय मिळाला नाही. त्यामुळे येत्या 5 तारखेला आपल्या समाजातील आमदार, माजी आमदारांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार आहोत. त्यांना आणण्याची जबाबदारी आम्ही पाच मंत्र्यांवर दिली आहे. त्या बैठकीत पुढील लढ्याचा निर्णय घेऊ,’ असे ते म्हणाले. बाइट
हे अधिवेशन 4 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे. 14 पर्यंत इमारतीसमोर आंदोलन करून इष्टलिंग पूजा करू. मात्र, आम्हाला न्याय न मिळाल्यास समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेऊ.

आरक्षण मिळत नसेल तर तुमच्या समाजाचे आमदार राजीनामे देणार का? सत्तेत राहून आमदारांनी आम्हाला न्याय द्यावा. काही आमदारांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. पण, मी नाही म्हणालो. मी तुम्हाला आत असताना लढायला सांगितले आहे,’ असे ते म्हणाले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री ए. बी. पाटील, शशिकांत नाईक, शिवशंकर, व्ही. आर. पाटील, महांतेश कडाडी, रुद्रगौडर पाटील, किरण साधूनावर व इतर लिंगायत पंचमसाली कार्यकारिणी सदस्य बैठकीत उपस्थित होते.

Tags: