लक्ष्मीनगर, गणेशपूर, हिंडलगा-बेळगाव येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी दुसरा वार्षिक क्रीडा मेळावा 2023-24 आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली, त्यानंतर सरस्वती पूजन झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन मास्टर श्रेयस कुंडेकर उपस्थित होते. त्याशिवाय शाळेचे अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, संचालक महेश नरगुंदकर आणि मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
अर्जुन गण, एकलव्य गण, बलराम गण आणि द्रोणाचार्य गण हे चार गण म्हणजे प्री-प्रायमरी नंतर ड्रिलचे प्रदर्शन केले. क्रीडा कर्णधार दर्शन नाईक यांनी मशाल वाहून आणली. त्यानंतर चारही गणांनी मार्चपास्ट केला. खेळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन मास्टर श्रेयस कुंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रिले व अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.


Recent Comments