युवक अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडून आपले उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यांनी वेळीच सावध होऊन आपले व पर्यायाने समाजाचे नुकसान टाळावे असे आवाहन डीसीपी स्नेहा पीव्ही यांनी केले.

बेळगावातील मराठा मंडळ डेंटल कॉलेज येथे आज “रॅगिंग आणि ड्रग्ज अवेअरनेस प्रोग्राम” आणि मानवाधिकार सेनेचे उदघाटन डीसीपी स्नेहा पीव्ही यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना डीसीपी स्नेहा पीव्ही म्हणाल्या की, शारीरिक आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी अनेकजण ड्रग्जकडे वळत आहेत. पण अशा चुकीच्या, अमली पदार्थांच्या सेवनाने आयुष्य संपुष्टात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावून घ्याव्यात, असे सांगितले.
क्षणिक सुखासाठी तरुण आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणे, असे पदार्थ ताब्यात ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, समाजातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना कमी झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास एपीएमसी पीएसआय मंजुनाथ, रमाकांत नाईक, नीरज बनस्कर , मनोज , संजय भंडारी , प्रोफ अंकुश जोतिबा, शेखर सिद्दन्नावर सतीश माळवदे, सुनील येळ्ळूरकर,जयश्री माळगी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments