नगरसेवक अभिजित जवळकर अटक प्रकरणात आता दक्षता हॉस्पिटलची एन्ट्री झाली आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. कमलाकर आचरेकर यांनी आज बेळगावचे पोलिस आयुक्त सिद्रामप्पा यांची भेट घेऊन बिल मिळवून देण्याची विनंती केली. टिळकवाडी पोलिसांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या संचालकांनी नंतर पवित्रा बदलला.
बेळगाव पोलिस आयुक्त कार्यालयात आज हायड्रामा झाला. टिळकवाडी पोलिसांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या दक्षता हॉस्पिटलचे संचालक डॉ. कमलाकर आचरेकर यांनी पेशंटला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज न करताच अटक केल्याचे लिहून दिले.
घटना घडली तेव्हा मी तिथे नव्हतो.रुग्णालयाच्या हितासाठी मी पोलिस आयुक्तांना भेटायला आलो होतो. माझ्या हॉस्पिटलचे 20 हजारांचे बिल थकले आहे. माझ्यावर कोणताही दबाव कोणीही आणलेला नाही. प्रकरणाबद्दल मला काही विचारू नका, आमच्या हॉस्पिटलबद्दल मला काहीही विचारा असे सांगितले. बाइट
26 तारखेला 12 वाजता हॉस्पिटलला डिस्चार्जची समरी मिळाली. आमच्याकडे बिलाची कोणतीही माहिती नाही आणि डिस्चार्जची प्रत मिळाल्यानंतर आम्ही जवळकर यांना अटक केली, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले. डिस्चार्जच्या वेळी ज्यांनी आमची तक्रार केली नाही, ते आज येऊन तक्रार करत आहेत, मी राजकारणावर बोलत नाही, आम्ही फक्त तपासाबाबत बोलत आहोत, आम्ही रीतसर, कायद्यानुसारच कारवाई केली आहे, असे ते म्हणाले.


Recent Comments