खासगी बँकेच्या कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता घरी रत्ना यनगन्नवर नावाच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी कर्ज काढून घेतलेली ‘वॅगन आर’ कार पळवून नेल्याच्या निषेधार्थ समता सैनिक दलातर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात समता सैनिक दलाच्यावतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली, रत्ना रामचंद्र यनगन्नवर यांनी कार खरेदी करण्यासाठी खासगी बँकेतून 6.32,000/- चे कर्ज घेतले होते, मे. 2023 पर्यंत रु. 2.50,000/- त्यांनी भरले आहेत. तरीही सुनील कित्तुर या खासगी बँकेच्या कर्मचाऱ्याने मारहाण करून गाडी हिसकावून घेतली, असा आरोप निदर्शकांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना रत्ना रामचंद्र यनगन्नवर यांनी सांगितले की, सुनील कित्तूर यांना फोन-पेमार्फत पैसे दिले होते, मात्र त्या व्यक्तीने उर्वरित पैशांची पावती दिली नव्हती. आम्ही कोणताही हप्ता थकीत राहणार नाही, याची काळजी घेतली होती. तरीही आम्हाला मारहाण करून गाडी पळवून नेल्याचा आरोप रत्ना रामचंद्र यनगन्नवर यांनी केला.
समता सैनिक दल उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष तुकाराम कांबळे म्हणाले की, रत्ना यनगन्नवर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गाडी हिसकावून घेणाऱ्या सुनील कित्तूर यांना 1979 आणि 2015 च्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे.
या आंदोलनात तुकाराम कांबळे, रत्ना यनगन्नवर, अशोक कोलकार, महादेवी आदी उपस्थित होते


Recent Comments