Belagavi

बेळगाव अधिवेशनासाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त : पोलीस आयुक्त सिद्रामप्पा

Share

बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले.

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात आज, सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त सिद्रामप्पा म्हणाले की, बेळगावात 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनापूर्वी सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण 5 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, 55 एस.पी., 42 डीवाय एसपी, 100 इन्स्पेक्टर, 250 पीएसआय आणि सिव्हिल, ट्रॅफिक, केएसआरपीसह 3 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवर्णसौधमध्ये 2 हजार पोलीस कर्मचारी, मुक्ती मठात 500 पोलिस राहतील. कंग्राळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात 300 लोकांची व्यवस्था, सांबरा विमानतळ आणि वीरभद्रेश्वर मंदिरात 300 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिवेशन काळात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा घेण्याबाबत आमच्याकडे कोणताही अर्ज आलेला नाही, अर्ज आल्यानंतर निर्णय घेऊ. एमईएसतर्फे काळा दिन पाळणाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत शंका घेऊ नका, एमईएस महामेळाव्याबाबत अर्ज मिळाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे पोलिस आयुक्त सिद्रामप्पा यांनी सांगितले.

Tags: