Belagavi

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनला राज्य पुरस्कार

Share

बेळगावमधील बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनला स्केटिंग क्षेत्रात महिला आणि बालकल्याणासाठी केलेल्या सेवेबद्दल 2023-24 चा कर्नाटक राज्य पुरस्कार मिळाला आहे.

गेल्या 16 वर्षापासुन मुलांच्या व मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या अथक परिश्रम आणि समर्पित सेवेसाठी कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने 2023-24 चा कर्नाटक राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

जवाहर भवन, कब्बन पार्क, बेंगळूर येथे बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खात्याच्या सहसंचालिका पुष्पलता रायर, संशोधन अधिकारी रूपश्री, संचालिका अर्चना, महिला व बालकल्याण विभाग सचिव प्रकाश, उपसंचालक निश्चल, अधीक्षक देवराज यांनी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचा राज्य पुरस्कार, शाल, प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रु. 1 लाख देऊन सत्कार केला. यावेळी इतर मान्यवर देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्थापना 2006 मध्ये झाली. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली बेळगाव शहर आणि आसपासच्या तालुक्यातील गरजू आणि गरीब मुलांना स्केटिंगचे प्रशिक्षण देत आहे. असोसिएशनचे हजारो स्केटर्सनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धामध्ये अनेक बक्षिसे जिंकली आहेत. असोसिएशनच्या काही स्केटर्सनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि बरेच उपक्रम केले आहेत. हे सर्व नवोदित स्केटर्स बेळगावातील रोटरी-कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी, केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक, गुडशेफर्ड स्कूल स्केटिंग रिंक तसेच निपाणी, संकेश्वर, गोकाक आणि विविध शाळांमध्ये सराव करत आहेत.

Tags: