दिव्यांग मुलांना पालकांनी, समाजाने बोजा समजू नये, या विध्यार्थ्यांना व्हीलचेअर व अन्य सुविधा मिळवून देण्यासाठी आवश्यक निधीसाठी अथक प्रयत्न करणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांनी दिली.

बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात शुक्रवारी शिकषष्ण खात्याच्या वतीने दिव्यांग विध्यार्थ्यांना तीनचाकी सायकली, श्रवण यंत्र व अन्य सुविधा देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी साहित्य वाटप केल्यानंतर आ. राजू सेठ बोलत होते.

आ. राजू सेठ पुढे म्हणाले की, दिव्यांग मुलेही निष्पाप, निरागस असतात. आज त्यांना आवश्यक साहित्य मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्यांचा हा आनंद बघून मलाही खूप आनंद झाला आहे. पालकांनी, समाजाने अशा मुलांना ओझे समजू नये. दिव्यांग असली तरी अशा मुलांना निसर्गाने विशिष्ट देणगी दिलेली असते. त्यामुळे त्यांच्या गरज पूर्ण झाल्यास, त्यांना आवश्यक सुविधा दिल्यास ही मुलेदेखील खूप काही करू शकतात. अशा मुलांसाठी सरकार, शिक्षण खाते मदत करत आहे. वैयक्तिक पातळीवर मी देखील मदत करणार आहे. त्यांना सुविधा देण्यासाठी सरकारकडून निधी देण्यासाठी मी सतत पाठपुरावा करेन असे त्यांनी सांगितले.
यावेळी 150 हून अधिक मुलांना शिक्षण खात्याकडून आलेल्या व्हीलचेअर, तीनचाकी सायकली, कुबड्या, श्रवण यंत्रे व अन्य उपकरणांचे आ. राजू सेठ यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. शहर गट शिक्षणाधिकारी प्रभावती हिरेमठ यांनी प्रास्ताविक करून शाळा आणि विध्यार्थी तसेच दिव्यांग विध्यार्थ्यांना उपकरणे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आ. राजू सेठ यांचे आभार मानले. खात्यातर्फे दिव्यांग विध्यार्थ्यांना फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील सरकारी शाळांचे विध्यार्थी, पालक व शिक्षण खात्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments