Belagavi

बेळगुंदीचे गिल्बर्ट डायस बेपत्ता

Share

बेळगुंदी येथील गिल्बर्ट बस्तु डायस (56) हे मंगळवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून बेळगुंदी येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत.

घरातून बाहेर पडताना त्यांनी जांभळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास 8217268979 किंवा 9480910523 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Tags: