Belagavi

डीजीपी आलोक मोहन यांची बेळगावला भेट

Share

कर्नाटकाचे पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी बेळगावला भेट देऊन विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बेळगावात येत्या 4 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून बैठकांचे सत्र बेळगावात सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आज डीजीपी अलोक मोहन यांनी बेळगाव एसपी कार्यालयाला भेट देऊन बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांना बेळगाव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

डीजीपी अलोक मोहन यांनी बेळगाव एसपी कार्यालयात बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी, धारवाड जिल्ह्यांच्या एसपींसोबत एक विशेष बैठक घेतली. यावेळी बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा, आयजीपी आर. हितेंद्र, बागलकोट एसपी आणि इतर जिल्ह्याचे एसपी उपस्थित होते.

Tags: