३०० महिलांच्या स्वागत कंग्राळी खुर्द येथील निलजकर कुटुंबीयांनी आपल्या घरी आगमन करणार्या मुलीचे स्वागत तब्बल 300 महिलांच्या एकत्रीत भजन गायनाने करून समाजासमोर एक आदर्श ठेवला असून परीसरात हा कौतुकाचा विषय झाला आहे .
आजच्या या प्रगत व सुशिक्षीत समजल्या जाणाऱ्या समाजात मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडणारे तसेच बारशाला डीजे लावून संस्कृतीला न शोभणारे कार्यक्रम करून धिंगाणा घालणारे लोक काय कमी नाहीत . पण याला फाटा देत सीमा प्रश्नासाठी त्यागाचा इतिहास असणाऱ्या निलजकर परिवारातील मा .ग्राम पंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व परशराम निलजकर यांनी आपल्या घरी , नातीच्या आगमनाच्या निमित्ताने बारसे कार्यक्रमात त्यांनी बेळगांव तालुक्यातील 10 महिला भजनी मंडळाना आमंत्रित करून सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यत तब्बल 300 महिलांचा एकत्रीत भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला .
यावेळी या सर्व महिलांनी एक सुरात सुरेल आवाजात भजन गायन करून उपस्थित पै पाहुणे व नातेवाईकांची वाहवा मिळवली
या भजन गायनानंतर बारसे करून मुलीच्या नामककरण सोहळा पार पाडला . यासाठी त्याना सप्तस्वरानंद संगीत कला संस्थेने मोलाचे सहकार्य केले .
या अशा एका वेगळया विधायक प्रकारे मुलीच्या घरी आगमनाचे स्वागत केलेने निलजकर दांपत्याच्या सप्त स्वरानंद संस्थेच्या वतिने शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून गुरुवर्य शंकर पाटील व त्यांचा सहकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . अशा प्रकारे मुलीचे घरी स्वागत करण्यासाठी त्यांना त्यांची दोन्ही मुले व सुनांनी आनंदाने होकार दिला . एकंदरीत या वेगळ्या प्रकारे झालेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजाने अशा आदर्शवत सोहळ्याचे अनुकरण करावे अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे .


Recent Comments