सेवेत कायम करावे, किमान वेतन निश्चित करावे आदी मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या अंगविकल गौरवधन सहाय्यकांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सुरु केली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अपंगांच्या पुनर्वसनाच्या हेतूने राज्य सरकारने ग्रामपंचायत स्तरावर त्यांची गौरवधन सहाय्यक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र गेल्या 15 वर्षांपासून त्यांना सेवेत कायम केलेले नाही, शिवाय अत्यल्प वेतनावर काम करावे लागत असल्याने चरितार्थ चालविणे अवघड होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर सेवेत कायम करावे, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रंथपाल आदी अन्य सेवकांप्रमाणे निश्चित वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी कलबुर्गी येथील नवकर्नाटक गौरवधन सहाय्यक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील गौरवधन सहाय्यकांनी आज बेळगावात हिवाळी अधिवेशनापूर्वीच एल्गार पुकारला
शहरातील चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यात राज्यभरातील अपंग गौरवधन सहाय्यकांनी पायी तसेच विशेष वाहनांवरून सहभाग घेतला. यावेळी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. फ्लो
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथील आवारात अपंग गौरवधन सहाय्यकांनी तेथे ठिय्या मांडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी ‘इन न्यूज’शी बोलताना कलबुर्गी येथील नवकर्नाटक गौरवधन सहाय्यक संघाचे पदाधिकारी अंबाजी मेटी यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून त्यांना सेवेत कायम केलेले नाही, शिवाय अत्यल्प वेतनावर काम करावे लागत असल्याने चरितार्थ चालविणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सेवेत कायम करावे, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रंथपाल आदी अन्य सेवकांप्रमाणे निश्चित वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी आम्ही बेमुदत आंदोलन पुकारले आहे. हिवाळी अधिवेशनात आमच्या मागण्यांवर चर्चा, विचार होऊन सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी अधिवेशनापूर्वी आम्ही हे आंदोलन करत आहोत. राज्यात 40 नव्या तालुका पंचायती निर्माण केल्या आहेत. तेथे अपंगांना गौरवधन सहाय्यक म्हणून नियुक्ती करावी, महाराष्ट्राप्रमाणे आमच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करावे, 5% अनुदानाचा गैरवापर रोखावा, या आमच्या अन्य मागण्या आहेत. सरकारने त्या त्वरित पूर्ण कराव्यात. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन सुरु ठेवणार आहोत असा इशारा त्यांनी दिला.
निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या अपंग गौरवधन सहाय्यकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.


Recent Comments