काँग्रेस नेत्या वीणा काशप्पण्णावर याच्या कारला अपघात झाल्याने त्या जखमी झाल्या आहेत . आमदार विजयानंद काशप्पण्णावर यांनी विजयपुर शहरातील खाजगी रुग्णालयाला भेट देऊन , त्यांची पत्नी वीणा काशप्पण्णावर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .
विजयपुर शहराच्या बाहेरील जेएसएस रुग्णालयात जाऊन विजयानंद काशप्पण्णावर यांनी वीणा काशप्पण्णावर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बागलकोट जिल्ह्यातील नागरिक व डॉक्टर उपस्थित होते. तत्पूर्वी आज आमदार विनय कुलकर्णी यांनी देखील या खासगी रुग्णालयात जाऊन वीणा काशप्पण्णावर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वीणा यांची प्रकृती चांगली आहे. कोणीही काळजी करण्याची गरज नसल्याची माहिती त्यांनी दिली. मुद्देबिहाळ मतदारसंघाचे आमदार अप्पाजी नाडगौडा यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


Recent Comments