तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने ह्युमॅनिटी फौंडेशनतर्फे बेळगावात आज तृतीयपंथीयांच्या ‘प्राईड वॉक’चे आयोजन करण्यात आले.

कॅम्पमधील संचयनी सर्कलमध्ये या प्राईड वॉक रॅलीला सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी चालना दिली. तेथून रॅली धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, कृष्णा देवराय सर्कल मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे समाप्त झाली.

यावेळी बोलताना तृतीयपंथीयांच्या नेत्या किरण बेदी म्हणाल्या की, प्राईड वॉक हा आमचा स्वाभिमानाचा वॉक आहे. समाजाला आम्ही काय आहोत हे दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही सलग २ वर्षे हा प्राईड वॉक करत आहोत. विविधतेत एकतेने आम्ही रहात आहोत. ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल तो दिवस आम्ही साजरा करू. समाजाने आम्हाला सन्मानाने वागावे पाहिजे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही सर्व तृतीयपंथीय एका ठिकाणी जमून देशाच्या स्वातंत्र्यदिनाप्रमाणे आमचा स्वातंत्र्यदिन सणासारखा साजरा करतो असे त्यांनी सांगितले.
आणखी एका तृतीयपंथीयाने सांगितले की, बेळगावात 500 हून अधिक तृतीयपंथीय आहेत. आम्हाला काही सरकारी सुविधा मिळायला हव्यात, त्यामुळे 2014 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हालाही योग्य दर्जा मिळायला हवा, सरकारला विनंती आहे की जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना मोकळेपणाने चालण्याचा, जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्याला शिक्षण आणि रोजगार या सर्व क्षेत्रात समान दर्जा मिळायला हवा. यावेळी जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांनी या स्वाभिमान पदयात्रेत सहभाग घेतला.


Recent Comments