Belagavi

ऊस दरासाठी बेळगांव – वेगुर्ला रोडवर चक्का जाम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आंदोलन

Share

पाटणे फाटा ता.चंदगड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेळगांव – वेगुर्ला रोडवर चक्का जाम आंदोलन केले. पाटणे फाटा ता.चंदगड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेळगांव – वेगुर्ला रोडवर चक्का जाम आंदोलन केले.

ऊस दरासाठी सुरू केलेले अंदोलन उसाचे दराची चर्चा फिसकटल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनाला चंदगड तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने ऊस दिला नाही.राजू शेट्टींच्या आदेशानुसार आज पाटणेफाटा व अडकुर येथे सकाळी ११ वाजता जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील व संघटनेचे नेते राजेंद्र गड्याण्णावर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी यांनी काही काळ रास्ता रोको केला.


यावेळी बोलताना जगन्नाथ हुलजी म्हणाले चंदगड तालुक्यात एकूण तीन साखर कारखाने आहेत शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातून ऊस आणून गाळत आहेत त्यासाठी आम्ही आजपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात ऊसाची वाहतूक करू देणार नाही तसं केल्यास वाहने आडवू आणि चंदगड तालुक्यातील त्रिकूट साखर कारखानदारांना चालूवर्षीय ३५०० व मागील ४०० रुपये दिल्या शिवाय उसतोड देणार नाही असे स्पष्ट सांगीतले.


या चक्काजाम अंदोलनावेळी चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक बारामती व कसेकर तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजींसह ४० शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.अशी माहिती पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.या चक्काजाम अंदोलनास चंदगड तालुक्यातील असंख्य शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: