Belagavi

आयुष टीव्ही मेगा ऑडिशनला कुंदानगरीत चांगला प्रतिसाद

Share

आयुष टीव्ही प्रस्तुत व्हॉईस ऑफ बेळगावसाठी आज लव्ह डेल स्कूलमध्ये मेगा ऑडिशन घेण्यात आली.

बेळगावमधील लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये आज शनिवारी आयुष टीव्हीच्या वतीने उत्तर कर्नाटकातील प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावचे आयुष व्हॉईस ऑफ म्युझिक, मातिन मल्ल, हरटेय कट्टे, स्टँड अप कॉमेडी अशा प्रकारात मेगा ऑडिशन घेतली.

या मेगा ऑडिशनमध्ये उत्तर कर्नाटकातील प्रतिभावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आयुष टीव्हीच्या ऑडिशनला चांगला प्रतिसाद मिळाला, तरुण-तरुणींनी आपले कौशल्य दाखवले. फ्लो
आयुष टीव्हीचे बिझनेस हेड नागेश देसाई यांनी आयुष ऑडिशनबद्दल माहिती दिली. बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील कलागुणांना समोर आणण्यासाठी आज ऑडिशन घेण्यात आल्या.

उत्तर कर्नाटकातील गायकांसाठी आयुष म्युझिक व्हॉईस ऑफ बेळगाव, वक्त्यांसाठी मातिन मल्ल, हरटेय कट्टे आणि कॉमेडियनसाठी स्टँड-अप कॉमेडियन ऑडिशन घेण्यात आल्या. या सर्व ऑडिशन्सला चांगला प्रतिसाद मिळाला. बेळगाव आणि इतर जिल्ह्यातून स्पर्धक आले आहेत. 9 आणि 10 डिसेंबर रोजी कुमार गंधर्व कला-रंग मंदिर येथे ग्रँड फिनाले घेण्याचा आमचा मानस आहे, सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली.

Tags: