दुचाकीला धडकून दुधवाहू रिक्षा उलटल्याने महिला व बालक जखमी झाले. हा अपघात आज सकाळी बेळगावातील काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरासमोर घडला.

अपघातग्रस्त दुधाच्या कॅन्सची वाहतूक करणारी मालवाहू रिक्षा बेळगावातून खानापुराकडे जात होती. त्यावेळी मिलिटरी महादेव मंदिरासमोर अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या मधोमध उलटली. या अपघातात दुचाकीवरील महिला व बालक गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर रिक्षातील दूध रस्त्यावर सांडून मोठे नुकसान झाले.

या अपघातामुळे काँग्रेस रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.


Recent Comments