Vijayapura

आमदार यत्नाळ यांचे हुकले विरोधी पक्षनेतेपद : कुडलसंगम श्रींचा संताप

Share

विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विरोधी पक्षनेते पद गमावल्याच्या मुद्द्यावरून पंचमसाली पीठाचे श्री जयमृत्युंजय यांनी भाजप नेत्यांवर संताप व्यक्त केला.
स्वामीजींनी विजयपुर येथे पत्रकार परिषद घेऊन पंचमसाली समाजावर यापूर्वी आरक्षण न देऊन अन्याय झाल्याचा संताप व्यक्त केला. आता बसनगौडा पाटील यत्नाळ याना विरोधी नेता पद न देऊन अन्याय केल्याचा आरोप केला आहे.

केवळ पंचमसाली समाजच नाही तर सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ते आणि हिंदू कार्यकर्त्यांसह अनेक समाजांनी आमदार यत्नाळ यांच्या बाजूने आग्रह धरला. पण हायकमांडच्या नेत्यांनी याचा विचार केला नाही, पंचमसाली समाजाच्या किंवा उत्तर कर्नाटकातील नेत्यांना स्थान द्यायला हवे होते. मात्र एकही जागा न दिल्याने पंचमासाली समाज नाराज असून, पंचमसाली समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Tags: