Belagavi

बेळगावात शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी अभिवादन

Share

बेळगावात शिवसेनेतर्फे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. खडेबाजार, बेळगाव येथील कृष्णज्योती अपार्टमेंटमधील शिवसेना कार्यालयात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘परत या, परत या बाळासाहेब परत या’ अशा घोषणा दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांच्या सतत खंबीरपणे पाठीशी राहून सीमाप्रश्नाच्या लढ्यात ताकद दिल्याचे सांगितले. मुंबईतील, महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी बांधवांच्या रक्षणासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला. देशातील हिंदूंनी एकसंघ राहून धर्माचे रक्षण करावे, मराठी माणसावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी संघटित व्हावे अशी त्यांची भूमिका होती असे त्यांनी सांगितले.

यावेळी परशराम गोंदकर, विनायक कुंडेकर, अमोल मजूकर, हणमंत जुम्मण्णावर, अशोक देसाई, प्रशांत खन्नूकर, राजू तोरगल, गुरखा, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, दिनेश दिवेकर, रमेश पाटील, अभिजित शिंदे, नारायण चंदगडकर, आकाश कुंडेकर, शौकत मुल्ला तसेच शिवसैनिक, सीमावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: