Belagavi

विशेषचेतन महिलांसाठी सौर स्वयंरोजगार मेळावा

Share

सौरऊर्जा क्षेत्रात रोजगार निर्माण करणाऱ्या सेल्कोचे काम कौतुकास्पद आहे. विशेषचेतन महिलांच्या आर्थिक विकासासाठी सौर रोजगार उपयुक्त ठरेल असे विचार बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर यांनी मांडले.

सेल्को सोलार कंपनीतर्फे शुक्रवारी बेळगावात कुमार गंधर्व कला रंगमंदिरात सौर स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर यांनी केले.
विशेषचेतन महिलांसाठी सौरऊर्जा क्षेत्रात रोजगार देण्याचा पहिला प्रयत्न सेल्कोकडून करण्यात आला आहे. यासाठी तुमची मेहनत खूप महत्त्वाची आहे. सौरऊर्जा स्वयंरोजगाराने महिलांच्या अडचणी दूर होऊन विकासासाठी सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सेल्कोचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रसन्न हेगडे म्हणाले की, सौरऊर्जा केवळ प्रकाशच देत नाही तर जीवन टिकवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सौरऊर्जा पोहोचवत आहोत असे ते म्हणाले.

यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज, सेल्को फाऊंडेशनचे उपमहाव्यवस्थापक प्रसन्ना हेगडे, वरिष्ठ कार्यक्रम संचालिका आर. सुरभी, वरिष्ठ योजना व्यवस्थापक विरेश तडहाळ, रमेश गोंगडी, महांतेश अगसीमुंडी, सेल्को फौंडेशनच्या वरिष्ठ प्रशासक सुरभी राजगोपाल, नागेश राव, प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश मेटी आदी उपस्थित होते. झोनल मॅनेजर विनायक हेगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Tags: