शेजारील महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी जाणाऱ्या बागलकोट जिल्ह्यातील गुलेदगुड्ड येथील कार्तिक पायी दिंडीच्या वारकऱ्यानी मंत्री एम. बी. पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी श्री क्षेत्र पंढरपूर कर्नाटक वासकर शिवूरकर सेवा मंडळाने आणलेल्या पालखीला मंत्री एम. बी. पाटील यांनी खांद्यावर घेतले . . यावेळी उपस्थित असलेल्या समितीचे प्रमुख पुंडलिक महाराज यांनी मंत्री महोदयांना उच्च पद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या. पदयात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना मंत्र्यांनी निरोप दिला. यावेळी , ए. एस. पाटील , एस. ए. बिरादार , जगदीश पाटील, बसवराज बागेवाडी, एम. बी. बगली आदी उपस्थित होते.


Recent Comments