Belagavi

बेळगावात आयुष टीव्हीतर्फे 18 नोव्हेंबर रोजी ऑडिशन्स

Share

आयुष टीव्हीतर्फे 18 नोव्हेंबर रोजी येथील महांतेश नगर येथील लवडेल सेंट्रल स्कूलमध्ये आयुष म्युझिक ऑफ व्हॉईस, हरट्टे कट्टे आणि स्टँडअप कॉमेडी किंग ऑफ बेळगाव या तीन ऑडिशन्स होणार आहेत अशी माहिती आयुष टीव्हीचे बिझनेस हेड नागेश देसाई यांनी दिली.

बेळगावात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना नागेश देसाई म्हणाले की, आयुष टीव्ही गेल्या सात वर्षांपासून आरोग्य आणि जीवनशैलीवर कार्यक्रम करत आहे. आयुष म्युझिक ऑफ व्हॉईस, हरट्टे कट्टे आणि कॉमेडी किंग ऑफ बेळगाव नावाच्या ऑडिशनचे आयोजन करून आम्ही पडद्यामागील प्रतिभावंतांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहोत, हा कॉमेडी शो टॅलेंट आणि चालू घडामोडी आणि आरोग्याविषयी गप्पा मारणारा स्टँड-अप कॉमेडी शो आहे.

ऑडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, वयोमर्यादा नाही. आयुष टीव्ही आणि सोनी म्युझिक कल्चरल अकादमी, बेळगाव यांच्या वतीने निरोगी मनोरंजनाच्या महामेळाव्यात विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Tags: