सहा वर्षांपासून अलारवाड ब्रीज जवळील सर्कलची दुरुस्ती करण्यात आलेली नाही . त्यामुळे या ठिकाणी , अनेक अपघात घडत आहेत . प्रशासनाने या सर्कलची डागडुजी करावी अशी मागणी करून , हालगा ग्रामस्थ व जिजामाता महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सर्कलमध्ये जोरदार निदर्शने केली .
बेळगावमधील आलारवाड ब्रिज सर्कलच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे . या सर्कलमध्ये वरचेवर अपघात होत आहेत . याचा निषेध नोंदवून , या सर्कलची दुरुस्ती करावी अशी मागणी करून ,हालगा ग्रामस्थ व जिजामाता महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सर्कलमध्ये जोरदार निदर्शने केली .
या संदर्भात ऍड . अण्णासाहेब घोरपडे यांनी सांगतले कि , 6 वर्षांपासून या सर्कलची दुरुस्ती झाली नाही . अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे तेव्हा प्रशासनाने त्वरित डागडुजी करावी अशी मागणी केली . अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला .
या वेळी मालन घोरपडे,सुजाता कामानाचे,कल्पना हनुमंताचे , सरिता येळ्ळूरकर, गीता कामानाचे,मनीषा कामानाचे ,रूपा येळ्ळूरकर, रेणू मास्तमर्डी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सागर कामानाचे,किरण हनुमंताचे,राजू कल्लिंग प्रफुल्ल मास्तमर्डी व ग्रामस्थ उपस्थित होते


Recent Comments