Belagavi

नवीन कपडे देऊन झोपडपट्टीत मुलांसोबत साजरी केली दिवाळी

Share

कलखांब येथील झोपडपट्टीतील मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे देऊन , त्या मुलांच्या चेहऱ्यावर फेसबुक फ्रेंड्सनी हास्य फुलवले .
दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीत मिठाई आणि नवीन कपडे खरेदी केले जातात . मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाना कुठली दिवाळी , कुठली मिठाई आणि कुठले नवीन कपडे .. दैनंदिन गरज भागवताना मेटाकुटीला येणारी ही कुटुंबे आपल्या मुलांना नवीन कपडे घेण्याचे स्वापदेखील बघू शकत नाहीत .. मग दिवाळी सण कसा साजरा करणार ?

मात्र फेसबुक फ़्रेंड्स च्या संतोष दरेकर , वढूत तुडवेकर , रोहित रणसुभे तसेच स्वयम पाटील यांनी , या झोपडपट्टीत मुलांना नवे कपडे देऊन त्यांना दिवाळीचा आनंद मिळवून दिला . कालखांबमधील झोडपडपट्टीत जाऊन त्यांनी सर्व लहान मुलांना नवीन कपडे आणि खाऊ दिला . यावेळी लहान मुलांसोबत केक कापून त्यांनी दिवाळी साजरी केली .
यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता . फेसबुक फ्रेंड्स नी या झोपडपट्टीतील गरीब मुलांना दिवाळीचा आनंद मिळवून दिला .

Tags: