बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावामध्ये लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिनी नेट क्रिकेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले.
युवकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच ते व्यसनापासून दूर रहावेत आणि त्यांनी गावाचे नाव उज्वल करावे या हेतूने कंग्राळी बुद्रुकमध्ये युवकांकरिता ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील आणि मारुती पाटील यांनी क्रिकेट प्रॅक्टिस करिता युवकांना नेट देऊ केले आहे. या नेट क्रिकेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मी पूजनादिवशी नेटचे पूजन करण्यात आले. जवळपास 80 हजार रुपये खर्च करून यल्लोजीराव पाटील आणि मारुती पाटील यांनी क्रिकेट ग्राउंडला नेट दिले. तसेच क्रिकेट किटचे पुजन करुन व नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील म्हणाले की, गावातील युवक तंदुरुस्त रहावेत, क्रिकेटमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवावे या हेतूने या नेट प्रॅक्टिस ग्राऊंडची उभारणी करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमी विरेश गौडर यांची ही संकल्पना आहे. गावातील युवकांनी याचा सदुपयोग घेऊन क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवावे असा शुभेच्छा त्यांनी दिल्या. बाईट.
यावेळी मारुती पाटील, विरेश गौडर, रामा निलजकर, संभाजी मासेकर यांच्यासह गावातील क्रिकेटप्रेमी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments