पेट्रोल पंपावर काम आटोपून घरी जाणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात घडली.
पेट्रोल पंपावर काम करून घरी जाणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात घडली. या घटनेनंतर त्याच वसाहतीतील तरुणाने ही हत्या केल्याचा संशय घेऊन मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या घरावर दगडफेक करून संताप व्यक्त केला.
25 वर्षीय शानूर पुजारी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाच-सहा हल्लेखोरांनी शानूरवर हल्ला करून खून केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शानूरच्या कुटुंबीयांनी संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबतची माहिती मिळताच गोकाक शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळावर चार सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र राखीव पोलीस दलाची तीन पथके तैनात करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात कडेकोट नाकाबंदी करण्यात आली.


Recent Comments