धावत्या ट्रेनमधून पडल्याने पाय कापला गेल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगावजवळील भांदूर गल्ली रेल्वे मार्गाजवळ घडली. रेल्वे पोलिसांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर यांच्या साहाय्याने जखमीला बिम्स रुग्णालयात केले आहे.


भांदूर गल्ली बेळगावच्या रेल्वे रुळावर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. त्याच्या पायाचा काही भाग कापला गेला आहे. लोकांच्या माहितीनुसार तो चालत्या ट्रेनमधून पडला. त्याच्या खिशात ट्रेनचे तिकीट, आधार कार्ड आहे. आधारकार्डनुसार त्यांचे नाव यल्लाप्पा चोपडे आहे. जन्मतारीख 1-6-1973 असून, त्याचा मोबाईल क्रमांक 9591035780 आहे. त्याच्याजवळील

कागदपत्रानुसार त्याचा पत्ता यल्लाप्पा संभाजी चोपडे, राहणार भूतनाथ गल्ली, माळअंकले, इदलहोंड, बेळगाव – कर्नाटक 591302. असा आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिस (जीआरपी) पथक तपास करत असून रुग्णाच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमला एक आपत्कालीन कॉल आला आणि घटनास्थळी पोहोचली. संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी बिम्स रुग्णालयात आहेत.
बेळगाव रेल्वे पोलिस (जीआरपी) टीम बिम्स हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहे. एएसआय रुद्रप्पा धुली आणि पीसी शिवानंद शिदनाळ यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमच्या मदतीने रुग्णाला 108 रुग्णवाहिकेतून बिम्स इस्पितळात दाखल केले. अतिरक्तस्रावामुळे जखमी बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


Recent Comments