जुन्या वादातून विजयपूर शहरातील ओडर ओणी येथे एका व्यक्तीवर गोळीबार केल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुहम्मद नदाफ, जमीर ऊर्फ जाम्या, कादर नदाफ, मलिक रेहान ऊर्फ फिरा, नबीरसूल ऊर्फ गुंड्या, समीर यारगल, चार्ली साम्या, तोहीद अथनूर, अब्दुल कादिर खादीम, मुज्जिन उर्फ मुज्जू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल संध्याकाळी सोएल कक्कल याच्यवर दुचाकीवरून आलेल्या 9 जणांनी गोळीबार केला आणि त्याच्यावर चाकूने वार केले. जखमी सोएलला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.याप्रकरणी गोलघुमट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments