सर्वसंगपरित्याग करून , जैन धर्माची दीक्षा घेतलेल्या , बेळगावमधील जैन दीक्षार्थींची मिरवणूक काढण्यात आली .

बळ्ळारी येथील स्वीटीबेन तसेच ह्रीधाकुमार , तसेच हैद्राबाद येथील कुशलकुमार , आणि बेळगावच्या साक्षीकुमारी यांनी संसार त्याग करून , संन्यासी मार्ग पत्करला आहे . गुरुवारी सकाळी बेळगावातील पांगुळ गल्ली येथील चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मंदिर येथून दीक्षार्थींची मिरवणूक काढण्यात आली .
पांगुळ गल्ली , भेंडीबाजार , खडेबाजार , रामदेवगल्ली , मारुती गल्ली , रविवार पेठ , मनासी गल्ली मार्गे पुन्हा मंदिरात येऊन या मिरवणुकीची सांगता करण्यात आली .
यावेळी उत्तमजी , बाबुलालजी , विजयजी , भातभाई , महेशजी पोरवाल , आदींसह ५०० हुन अधिक जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते . दीक्षा घेतलेल्या चारही जणांचा , श्री जैन समाज संघाकडून सत्कार करण्यात आला .


Recent Comments