कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) वार्षिक क्रीडास्पर्धांचे बेळगावात आज शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

मच्छे (ता. बेळगाव) येथील केएसआरपी सेकंड बटालियन आणि पोलीस प्रशिक्षण विद्यालय, कंग्राळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात केएसआरपीच्या दोन दिवसीय वार्षिक क्रीडास्पर्धांचे आयोजन केले आहे. आज, मंगळवारी आयोजित शानदार समारंभात केएसआरपीच्या वार्षिक क्रीडास्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. बेळगाव जिल्हा पंचायतीचे योजनाधिकारी गंगाधर दिवतारे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले आणि खेळाचे महत्त्व सांगितले.

केएसआरपी सेकंड बटालियनचे कमांडंट रमेश बोरगावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सर्वांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक कमांडंट चन्नबसव, नागेश यडाल, आशिष मेघनवार व आरपीआय पांडू, सुरेश लक्कनवर, महेश श्रीमंत, बसाप्पा, दयानंद, संतोष, ज्योती आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments