Belagavi

बैलहोंगलमध्ये जुगाऱ्यांना पोलिसांचा दणका; क्लबवरील छाप्यात तब्बल 70 जुगाऱ्यांना अटक

Share

बेळगावच्या सीइएन पोलिसांनी बैलहोंगल येथे भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चांगलाच दणका दिला. या कारवाईत तब्बल 70 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.

जिल्हा सीइएन पोलिसांनी रविवारी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 70 जणांना अटक केली आहे. जनतेने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत सीपीआय बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सीइएन पोलिसांच्या पथकाने क्लबवर छापा टाकून 2 लाख रुपये आणि 75 मोबाईल फोन जप्त केले. पोलिसांनी सांगितले की, क्लबच्या मालकाविरुद्ध तपास सुरू असून बेळगाव जिल्हा सीईएन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलहोंगलमधील संस्कृत बार अँड रेस्टॉरंट येथील एका क्लबशेजारी मोठा जुगार अड्डा भरविण्यात आला होता. याबाबत जिल्हा अपराध नियंत्रण विभागाला माहिती मिळताच सापळा रचून छापा टाकण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी क्लबवर अचानक छापा टाकून एकूण 70 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख रुपये आणि 75 मोबाईल फोन जप्त केले. क्लबच्या पहिल्या मजल्यावर हा जुगारी अड्डा भरविण्यात आला होता.

अटक केलेल्या सर्व 70 जुगाऱ्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात दोन पोलीस बसमधून बेळगावला सीइएन पोलीस कार्यालयात आणून कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. रात्री उशिरापर्यं त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सीइएन पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Chikodi #gambling #arrest