बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील ग्राम पंचायतीच्या मालकीच्या 18 एकर जागेवर एका दलित युवकाने अतिक्रमण करून शेड बांधले आहे. ते पाडून जागा ग्रापंच्या ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थ व ग्रापं सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या बिजगर्णी गावातील ग्राम पंचायतीच्या मालकीच्या 18 एकर जागेवर नंदा मारुती कांबळे व त्यांचा मुलगा परशराम कांबळे यांनी अतिक्रमण करून शेड बांधल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही जागा बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या मालकीची असल्याने सर्व ग्रामस्थांचा जागेवर हक्क आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून जागा पूर्ववत ग्राम पंचायतीच्या ताब्यात देण्याच्या मागणीचे निवेदन आज ग्रापं सदस्य व प्रमुख ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या संदर्भात इन न्यूजशी बोलताना बिजगर्णी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी सांगितले की, कित्येक वर्षांपासून बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या 18 एकर सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गावातीलच नंदा मारुती कांबळे व त्यांचा मुलगा परशराम कांबळे यांनी तेथे अतिक्रमण करून शेड बांधले आहे. याबाबत पिडिओने विचारणा केल्यावर त्याच्यावरच खोटी दलित अत्याचाराची केस घालतो अशी धमकी देऊन त्यांनी पोडीओचा छळ केला आहे. त्यामुळे हे प्रकरण संपवा अन्यथा तोपर्यंत मी गावात येणार नाही अशी भूमिका पिडिओने घेतली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची कामेही ठप्प झाली आहेत.
यापूर्वी आम्ही तालुका पंचायतीला तीनवेळा निवेदन-तक्रारी दिल्या आहेत. तालुका पंचायतीनेही त्याला नोटीस पाठवली आहे. मात्र परशराम व नंदा कांबळे त्याला दाद देत नाहीत. दलितांवर अत्याचार होत असल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या मालकीच्या या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण दूर करून पूर्वीप्रमाणे ही जागा पंचायतीच्या ताब्यात देण्याच्या मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा सर्व 3 ते 4 हजार बिजगर्णी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करतील असा इशारा मनोहर बेळगावकर यांनी दिला.
यावेळी ऍड. नामदेव मोरे, पूजा सुतार, संदीप अष्टेकर, मेहबूब नावगेकर, चंद्रकांत जाधव, शीतल तारिहाळकर, गायत्री सुतार यांच्यासह बिजगर्णी ग्राम पंचायतीचे अन्य सदस्य व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments