Belagavi

रमेश जारकीहोळी आमच्या पक्षाचे नेते, आम्ही त्यांच्याच पाठीशी राहू : संजय पाटील

Share

माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे आमच्या पक्षाचे, भाजपचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी राहू, आम्ही डीके शिवकुमार यांची बाजू घेऊ शकत नाही असे भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

बेळगावात प्रवासी मंदिर येथे पत्रकार परिषदेत बोलताना बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, आम्ही डी.के.शिवकुमार यांची बाजू घेऊ शकत नाही. माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे आमच्या भाजपचे आहेत. त्यांची नुकतीच झालेली पत्रकार परिषद वैयक्तिक होती. ते आमचे नेते आहेत. आम्ही डीके शिवकुमार यांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही. आम्ही रमेश जारकीहोळी यांच्या बाजूने उभे राहू, असे ते म्हणाले.

16 आणि 17 नोव्हेंबर रोजी भाजपचे दुष्काळ पाहणी पथक बेळगाव जिल्ह्याच्या दुष्काळी अभ्यास दौऱ्यावर येणार आहे. भाजप दुष्काळ अभ्यास पथक 16 नोव्हेंबर रोजी चिक्कोडी, रामदुर्ग आदी तालुक्यात पाहणी करणार आहे. 17 रोजी बेळगाव, बैलहोंगल आदी तालुक्यात पाहणी करणार आहे. खासदार इरण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, हणमंत निरानी, ​​यांच्यासह जिल्हा भाजपचे नेते दुष्काळ अभ्यास पथकात असतील, असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माध्यम समन्वयक शरद पाटील आदी उपस्थित होते.

Tags: