कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या कुंदानगरी बेळगावात या तिन्ही राज्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे खवय्यांची गर्दीही खूप असते, हॉटेल व्यवसायालाही मागणी वाढत आहे. यातूनच देश-विदेशातील प्रसिद्ध रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे ‘हॉटेल स्पाईसेस’ हे नवे हॉटेल बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाले आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या कुंदानगरी बेळगावात खवय्यांची संख्या वाढत आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील उद्योजक, व्यावसायिकांची वर्दळ वाढत असल्याने हॉटेल व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत. खवय्यांना विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचे चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बेळगावात आता ‘हॉटेल स्पाईसेस’ हे नवे खाद्यदालन सुरु झाले आहे.
या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला परदेशातील एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा भास होईल. हॉटेलमधील इंटीरियर आणि फर्निचर ग्राहकांच्या हृदयाला भिडणारे आणि अद्ययावत पद्धतीचे करण्यात आले आहे.
हॉटेलच्या उद्घाटनाबाबत इन न्यूज चॅनलशी बोलताना मालक वाहिद खान आणि मुदस्सर साजन यांनी सांगितले की, विविध प्रकारचे थाई कॉन्टिनेंटल फूडसह स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हॉटेल सुरू केले आहे. उच्च दर्जा, जिभेवर रेंगाळणारी चव आणि तत्पर सेवा येथे देण्यात येणार आहे. बेळगावातील आणि बाहेरच्या खाद्यप्रेमींना एकदा येथे भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
एकंदरीत या हॉटेलच्या भव्य उदघाटनाला आलेले खाद्यप्रेमी हे आकर्षक हॉटेल पाहून आनंदित झाले. बेळगाव शहरातील अनेक मान्यवरांनी येऊन मालक वाहिद खान व मुदस्सर साजन यांना शुभेच्छा दिल्या.


Recent Comments